avatarShashi Kulkarni

Free AI web copilot to create summaries, insights and extended knowledge, download it at here

3304

Abstract

ी, देखतां कांपती भयें ।।५।।</b></p><p id="8eb6">महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर असलेल्या ध्वजावर विराजमान होऊन, आपल्या बाहूंच्या बळाने आणि मोठ्या आवेशाने रथ पुढे नेऊन त्याच्या विजयामध्ये महत्वाचा वाटा उचलणारा, कुणालाही न घाबरणाऱ्या समयरूपी आणि मृत्युरूपी रौद्र अशा काळाचा अग्नी देखील ज्याच्यापुढे थरथरा कापतो असा हा मारुती.</p><p id="5fed"><b>ब्रह्मांडे माईले नेणों, आवळें दंतपंगती । नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी ताठिल्या बळें ।।६।।</b></p><p id="aeca">ज्याच्या डोळ्यात अवघे ब्रह्माण्ड मावले आहे, जो दातओठ खाऊन, आणि मोठ्या आवेशाने भुवया ताणून, डोळ्यांमधून रागाच्या ज्वाळा ओतून, काळाला देखील घाबरवून सोडतो आहे असा हा मारुती.</p><p id="309c"><b>पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं । सुवर्णकटीकासोटी, घंटा किंकिणी नागरा ।।७।।</b></p><p id="3f0c">ज्याचे शेपूट फुलारले आहे, माथ्यावर मुकुट आहे, आणि कानामध्ये अतिशय सुंदर अशी कुंडले घातली आहेत, कमरेला सोन्याची कासोटी परिधान केली आहे, कि ज्याच्यावर त्याचा कडदोरा आपटून मंजुळ असा घंटानाद येतो आहे, असा हा हनुमान.</p><p id="f720"><b>ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।।८।।</b></p><p id="9048">जो रावणासमोर देखील पर्वतासारखा उत्तुंग उभा ठाकलेला आहे, अतिशय बांधेसूद आणि तरीदेखील सडपातळ शरीर असलेला, ज्याची शेपूट रावणाच्या आसनापेक्षाही मोठी आहे, आणि आग लागली असतानाही संपूर्ण लंकेचे दहन करण्याएवढी विजेसारखी चपळ आहे असा हा रामदूत.</p><figure id="dffc"><img src="https://cdn-images-1.readmedium.com/v2/resize:fit:800/1*JqYqX61vZceIPyU0Hfk12A.jpeg"><figcaption>Shri Hanuman</figcaption></figure><p id="5016"><b>कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे । मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।९।।</b></p><p id="d919">प्रचंड आणि मोठमोठी उड्डाणे घेऊन, उत्तरेकडे झेपावून, मंदार पर्वतासारखा, प्रचंड द्रोण पर्वत, ज्याने क्रोधाने, मुळासकट उपटून काढला, असा हा महाबळी हनुमान.</p><p id="9376"><b>आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती । मनासी टाकिलें मागें, गतीसी तूळणा नसे ।।१०।।</b></p><p id="0996">हा प्रचंड द्रोण पर्वत, ज्याने लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी आणला आणि परतही नेला, आणि तो संपूर्ण प्रवास मनाच्या वेगाने केला, खरे तर मनाच्या वेगालाही ज्याने मागे टाकले, त्याच्या गतीची तुलना, इतर कशाशीही होऊच शकत नाही, असा हा वायुपुत्र मारुती.</p><p id="ae0c"><b>अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ।।११।।</b></p><p id="eb2e">सिद्धी प्राप्त असलेला, अणुएवढा छोटा होऊन अशोकवनात सीतेकडे आणि ब्रह्माण्डाएवढा मोठा होऊन समुद्रातील राक्षसीचा वध करणारा, ज्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही आणि ज्याच्यापुढे मेरू, मंदार यासारखे पर्वत देखील छोटे वाटतात, असा हा, भीमरूपी हनुमान.</p><p id="026b"><b>ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छे करू शके । तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।१२।।</b></p><p id="fef4">आपल्या, वज्रासारख्या सामर्थ्यवान असलेल्या शेपटाने, जो, अख्ख्या ब्रह्मांडालाही वेढा घालू शकतो, त्या हनुमानाची तुलना या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये शोधूनही कोणाशीही होऊ शकत नाही.</p><p id="3d43"><b>आरक्त देखिलें डोळां, ग्रासिले सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।।१३।।</b></p><p id="8057">अशा या मारुतीने जन्म घेतल्यावर लगेचच एखादे फळ समजून, लालभडक अशा सूर्याकडे, त्याला गिळून टाकण्यासाठी उड्डाण केले. त्याला स्वतःचा आकार या संपूर्ण विश्वालाही भेदून जाईल एवढा मोठा करणे सहज शक्य होते.</p> <figure id="c3e9"> <div> <div> <img class="ratio" src="http://placehold.it/16x9"> <iframe clas

Options

s="" src="https://cdn.embedly.com/widgets/media.html?src=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fembed%2F4wnFQ8LF_1E%3Ffeature%3Doembed&amp;display_name=YouTube&amp;url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3D4wnFQ8LF_1E&amp;image=https%3A%2F%2Fi.ytimg.com%2Fvi%2F4wnFQ8LF_1E%2Fhqdefault.jpg&amp;key=a19fcc184b9711e1b4764040d3dc5c07&amp;type=text%2Fhtml&amp;schema=youtube" allowfullscreen="" frameborder="0" height="480" width="854"> </div> </div> </figure></iframe></div></div></figure><p id="fac8"><b>धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही । पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां ।।१४।।</b></p><p id="14b0">अशा मारुतीचे हे स्तोत्र पठण करणाऱ्याला धन, धान्य, पशुधन यामध्ये समृद्धी, आणि मुलेबाळे, नातवंडे, रूप, विद्या, हे सर्वकाही प्राप्त होते.</p><p id="cd9c"><b>भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही । नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।।१५।।</b></p><p id="ad13">अशा या भीमरूपी हनुमानाचे दर्शन घेतल्यावर भूत, प्रेत, समंध, सर्व प्रकारचे रोग आणि आजार, नाहीसे होतात. सर्व चिंता नष्ट होतात आणि अशा प्रकारे सुदृढ शरीर आणि खंबीर मन प्राप्त होऊन आनंदी जीवन जगता येते.</p><p id="c193"><b>हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी। दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।।१६।।</b></p><p id="226e">अशा या पंधरा श्लोकांच्या मारुती स्तोत्राचे पठण करणाऱ्यास शुक्ल पक्षातील, सतत वाढणाऱ्या चंद्रकलेप्रमाणे, नेहमी वृद्धिंगत होणारे शरीर, निसंदेह प्राप्त होईल.</p><p id="4e40"><b>रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडणू । रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।१७।।</b></p><p id="42ca">श्री रामाच्या सेवकांमध्ये, भक्तांमध्ये, सर्वश्रेष्ठ असलेल्या, संपूर्ण वानर कुळाचे भूषण असलेल्या, ज्याचा अंतरात्मा प्रत्यक्ष श्री रामाच्या ठिकाणी आहे अशा मारुतीच्या दर्शनाने सर्व दोष नाहीसे होतात.</p><p id="a976"><b>।। इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।</b></p><p id="b1b3">अशा प्रकारे श्री समर्थ रामदासांनी रचलेले हे संकटनाशक असे मारुती स्तोत्र संपूर्ण झाले.</p> <figure id="a0d9"> <div> <div> <img class="ratio" src="http://placehold.it/16x9"> <iframe class="" src="https://cdn.embedly.com/widgets/media.html?src=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fembed%2F4wnFQ8LF_1E%3Ffeature%3Doembed&amp;display_name=YouTube&amp;url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3D4wnFQ8LF_1E&amp;image=https%3A%2F%2Fi.ytimg.com%2Fvi%2F4wnFQ8LF_1E%2Fhqdefault.jpg&amp;key=a19fcc184b9711e1b4764040d3dc5c07&amp;type=text%2Fhtml&amp;schema=youtube" allowfullscreen="" frameborder="0" height="480" width="854"> </div> </div> </figure></iframe></div></div></figure><div id="7d73" class="link-block"> <a href="https://medium.com/dialogue-with-the-mind"> <div> <div> <h2>A Dialogue With Our Mind</h2> <div><h3>A publication to share something from the heart mainly focused on spirituality</h3></div> <div><p>medium.com</p></div> </div> <div> <div style="background-image: url(https://miro.readmedium.com/v2/resize:fit:320/1*9dNAmjJvQZbOSXhzWMO6UA.jpeg)"></div> </div> </div> </a> </div><figure id="3379"><img src="https://cdn-images-1.readmedium.com/v2/resize:fit:800/0*UvGDRnfx3m32VxTw.jpeg"><figcaption></figcaption></figure></article></body>

मारुती स्तोत्र — मराठी अर्थ आणि विवरण — भीमरूपी महारुद्रा — Bhimarupi Maharudra

The meaning and explanation in the spoken Marathi language as of today

Panchmukhi Hanuman

मारुती स्तोत्र आणि त्याचे लाभ

मारुती स्तोत्र हे समर्थ रामदासांनी रचलेले आणि संकटनाशक असे आहे. सकाळी स्नान करून, मारुतीचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवून हे पठण केले असता त्याचा जास्तीत जास्त लाभ होतो, दोष, रोग, आजार नाहीसे होतात, शरीर बळकट होते, मन भक्कम होते, आपल्या पाठीशी तो मारुती नेहमी आहे असा धीर मिळतो.

त्यातही महत्वाचे म्हणजे या स्तोत्राचा अर्थ समजावून घेऊन ते म्हटले कि त्याचा खरा आनंदही मिळतो.

एक उदाहरण द्यायचे झाले तर मूर्ती प्रतिष्ठापनाचे घेउया. मूर्ती आणली की आपण तिची स्थापना करण्यासाठी पूजापाठ करतो, देवाला आवाहन करतो. त्या मूर्तीमध्ये देवाची प्रतिष्ठापना झाल्यावर मग ती मूर्ती रहात नाही, प्रत्यक्ष देव तिथे वास करतो.

तसेच, नुसते स्तोत्र पाठ करून म्हणणे हे म्हणजे नुसती मूर्ती असल्यासारखे आहे. पण त्याचा अर्थ समजावून घेतल्यावर जेव्हा आपण ते म्हणतो तेव्हा ते नुसते स्तोत्राचे पठण होत नाही, तर त्यामध्ये आपल्या भावना देखील ओतल्या जातात आणि एक वेगळाच अनुभव येतो — जणू काही देव समोर आहे आणि त्याच्यात एकरूप होऊन, तल्लीन होऊन ते स्तोत्र आपण त्याला अर्पण करत आहोत असा काहीसा अनुभव येतो.

चला तर मग, घेऊया समजून, मारुती स्तोत्राचा अर्थ, साध्या, सोप्या, मराठी भाषेमध्ये.

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती । वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।१।।

भीमकाय, म्हणजे प्रचंड मोठी काया असलेला, शंकराचा अकरावा अवतार असलेला, रौद्ररूप धारण केलेला, जन्मल्या जन्मल्याच ज्याने फळ समजून सूर्याला गिळण्यासाठी झेप घेतली, त्यावेळी इंद्राने अनर्थ टाळण्यासाठी ज्याच्या हनुवटीवर वज्राघात केला, आणि त्यामुळे जो परत पृथीवर आला, तो वज्रासारखी अभेद्य हनुवटी घेऊनच, वायुचा पुत्र मारुती, आपल्या प्रचंड बळाच्या जोरावर, वनेच्या वने उपटणारा, अगदी अशोक वनालाही घाबरवून सोडणारा, अंजनीचा पुत्र, बळाच्या जोरावर विनाश घडवून आणू शकणारा, रामाचा राजदूत बनून रावणाकडे गेलेला, असा हा हनुमान.

महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें । सौख्यकारी दुःखहारी, धूर्त वैष्णव गायका ।।२।।

महाबलाढ्य असा, संजीवनी मुळी आणून लक्ष्मणालाही परत जिवंत करणारा प्राणदाता, आपल्या बळाच्या जोरावर सगळ्यांना हादरवून सोडणारा, अगदी भीमाचाही अहंकार दूर करणारा, सुख मिळवून देणारा, दुःखाचा नाश करणारा, अतिशय धूर्त असलेला, विष्णूचा अवतार असलेल्या श्री रामाचे सदैव गुणगान करणारा, असा हा मारुती.

दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा । पाताळदेवताहंता, भव्य सिंदूरलेपना ।।३।।

गोर गरिबांचा वाली, प्रत्यक्ष श्री रामाचे रूप असलेला, सौष्ठवपूर्ण शरीराचा अतिशय देखणा, पारलौकिक असा, पाताळातील दुष्ट शक्तींचा नाश करणारा, अतिशय भव्य असलेला, सर्वांगाला शेंदूर लावलेला, असा हा मारुती.

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ।।४।।

सर्व लोकांना आश्रय देणारा, जगाचा पालनकर्ता, बळकट शरीर मिळवून देणारा जीवनाचा रक्षक, प्राचीन काळापासून जगाच्या अंतापर्यंत अमर असलेला चिरंजीव असा, पुण्यवान, ज्याचे नित्य वर्तन पुण्यमय आहे असा, अतिशय पवित्र आणि आनंददायक असा हा हनुमान.

ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें । काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।५।।

महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर असलेल्या ध्वजावर विराजमान होऊन, आपल्या बाहूंच्या बळाने आणि मोठ्या आवेशाने रथ पुढे नेऊन त्याच्या विजयामध्ये महत्वाचा वाटा उचलणारा, कुणालाही न घाबरणाऱ्या समयरूपी आणि मृत्युरूपी रौद्र अशा काळाचा अग्नी देखील ज्याच्यापुढे थरथरा कापतो असा हा मारुती.

ब्रह्मांडे माईले नेणों, आवळें दंतपंगती । नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी ताठिल्या बळें ।।६।।

ज्याच्या डोळ्यात अवघे ब्रह्माण्ड मावले आहे, जो दातओठ खाऊन, आणि मोठ्या आवेशाने भुवया ताणून, डोळ्यांमधून रागाच्या ज्वाळा ओतून, काळाला देखील घाबरवून सोडतो आहे असा हा मारुती.

पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं । सुवर्णकटीकासोटी, घंटा किंकिणी नागरा ।।७।।

ज्याचे शेपूट फुलारले आहे, माथ्यावर मुकुट आहे, आणि कानामध्ये अतिशय सुंदर अशी कुंडले घातली आहेत, कमरेला सोन्याची कासोटी परिधान केली आहे, कि ज्याच्यावर त्याचा कडदोरा आपटून मंजुळ असा घंटानाद येतो आहे, असा हा हनुमान.

ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।।८।।

जो रावणासमोर देखील पर्वतासारखा उत्तुंग उभा ठाकलेला आहे, अतिशय बांधेसूद आणि तरीदेखील सडपातळ शरीर असलेला, ज्याची शेपूट रावणाच्या आसनापेक्षाही मोठी आहे, आणि आग लागली असतानाही संपूर्ण लंकेचे दहन करण्याएवढी विजेसारखी चपळ आहे असा हा रामदूत.

Shri Hanuman

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे । मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।९।।

प्रचंड आणि मोठमोठी उड्डाणे घेऊन, उत्तरेकडे झेपावून, मंदार पर्वतासारखा, प्रचंड द्रोण पर्वत, ज्याने क्रोधाने, मुळासकट उपटून काढला, असा हा महाबळी हनुमान.

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती । मनासी टाकिलें मागें, गतीसी तूळणा नसे ।।१०।।

हा प्रचंड द्रोण पर्वत, ज्याने लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी आणला आणि परतही नेला, आणि तो संपूर्ण प्रवास मनाच्या वेगाने केला, खरे तर मनाच्या वेगालाही ज्याने मागे टाकले, त्याच्या गतीची तुलना, इतर कशाशीही होऊच शकत नाही, असा हा वायुपुत्र मारुती.

अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ।।११।।

सिद्धी प्राप्त असलेला, अणुएवढा छोटा होऊन अशोकवनात सीतेकडे आणि ब्रह्माण्डाएवढा मोठा होऊन समुद्रातील राक्षसीचा वध करणारा, ज्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही आणि ज्याच्यापुढे मेरू, मंदार यासारखे पर्वत देखील छोटे वाटतात, असा हा, भीमरूपी हनुमान.

ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छे करू शके । तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।१२।।

आपल्या, वज्रासारख्या सामर्थ्यवान असलेल्या शेपटाने, जो, अख्ख्या ब्रह्मांडालाही वेढा घालू शकतो, त्या हनुमानाची तुलना या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये शोधूनही कोणाशीही होऊ शकत नाही.

आरक्त देखिलें डोळां, ग्रासिले सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।।१३।।

अशा या मारुतीने जन्म घेतल्यावर लगेचच एखादे फळ समजून, लालभडक अशा सूर्याकडे, त्याला गिळून टाकण्यासाठी उड्डाण केले. त्याला स्वतःचा आकार या संपूर्ण विश्वालाही भेदून जाईल एवढा मोठा करणे सहज शक्य होते.

धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही । पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां ।।१४।।

अशा मारुतीचे हे स्तोत्र पठण करणाऱ्याला धन, धान्य, पशुधन यामध्ये समृद्धी, आणि मुलेबाळे, नातवंडे, रूप, विद्या, हे सर्वकाही प्राप्त होते.

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही । नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।।१५।।

अशा या भीमरूपी हनुमानाचे दर्शन घेतल्यावर भूत, प्रेत, समंध, सर्व प्रकारचे रोग आणि आजार, नाहीसे होतात. सर्व चिंता नष्ट होतात आणि अशा प्रकारे सुदृढ शरीर आणि खंबीर मन प्राप्त होऊन आनंदी जीवन जगता येते.

हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी। दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।।१६।।

अशा या पंधरा श्लोकांच्या मारुती स्तोत्राचे पठण करणाऱ्यास शुक्ल पक्षातील, सतत वाढणाऱ्या चंद्रकलेप्रमाणे, नेहमी वृद्धिंगत होणारे शरीर, निसंदेह प्राप्त होईल.

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडणू । रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।१७।।

श्री रामाच्या सेवकांमध्ये, भक्तांमध्ये, सर्वश्रेष्ठ असलेल्या, संपूर्ण वानर कुळाचे भूषण असलेल्या, ज्याचा अंतरात्मा प्रत्यक्ष श्री रामाच्या ठिकाणी आहे अशा मारुतीच्या दर्शनाने सर्व दोष नाहीसे होतात.

।। इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।

अशा प्रकारे श्री समर्थ रामदासांनी रचलेले हे संकटनाशक असे मारुती स्तोत्र संपूर्ण झाले.

Spiritual
Prayer
Hanuman
India
Hinduism
Recommended from ReadMedium